घरोघरी तिरंगाः अश्वारुढ स्वारांनी केली जनजागृती

 







            अकोला, दि.१२(जिमाका)- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दि.१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान आयोजीत ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज अश्वारुढ स्वारांची रॅली काढण्यात आली. या रॅलीत जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी अश्वारुढ होऊन ‘घरोघरी तिरंगा’ अभियानाची जनजागृती केली.

            जिल्हाधिकारी कार्यालयापासून या रॅलीस सुरुवात झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, विश्वनाथ घुगे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, तहसिलदार सुनिल पाटील, जिल्हा खनिकर्म अधिकारी प्रणिता चापले, अधीक्षक मिरा पागोरे आदी उपस्थित होते. ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालयापासून निघून अशोक वाटीका, उड्डाणपूल मार्गे, अग्रसेन चौकात गेली. तेथून ही रॅली  टॉवर चौक येथे आली व तेथे समारोप करण्यात आला. विशेष म्हणजे जिल्ह्यातील बॅंजो पार्टी पथकांनीही या रॅलीत स्वयंस्फूर्त सहभाग घेतला. त्यांनी या रॅलीत वाद्यवृंदावर देशभक्तीपर गित सादर केले, त्यामुळे वातावरण भारावून गेले होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ