मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त विविध उपक्रम


        अकोला,दि.24(जिमाका)-  क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा दिन व  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त ‘फिट इंडिया कार्यक्रम’अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. हे उपक्रम सोमवार दि. 29 ऑगस्ट रोजी सकाळी आठपासून स्व. वसंत देसाई स्टेडियम अकोला येथे आयोजन होणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुळकर्णी यांनी दिली.

कार्यक्रम याप्रमाणे : सकाळी आठ वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्याहस्ते मेजर ध्यानचंद यांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन व उपस्थित खेळाडूंना मार्गदर्शन. सकाळी सव्वा आठ वाजता जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र अकोलाव्दारे खो-खो प्रदर्शनीय सामना, सकाळी सव्वा आठ वाजता बॅडमिंटन प्रदर्शनीय सामना, सकाळी सव्वा आठ वाजता बॉक्सींग प्रदर्शनीय सामना, सकाळी सव्वा आठ वाजता हॉकी प्रदर्शनीया सामना. सकाळी आठ वाजता आंतरराष्ट्रीय खेडाळूंचे स्वागत व  सकाळी 10 वाजता वसंत देसाई स्टेडियम येथे स्वच्छता अभियान.

            मेजर ध्यानचंद राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त सर्व शाळा, महाविद्यालय व क्रीडा मंडळांनी खेळाचे प्रदर्शनीय सामने, परिसंवाद, चर्चासत्र व व्यायाम प्रात्याक्षिक असे विविध उपक्रम राबवावी. तसेच स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त सोमवार दि. 29 ते 2 ऑक्टोंबर या कालावधीत जिल्ह्यामध्ये ‘फिट इंडिया फ्रिडम रन’ ही उपक्रम राबवावा. या उपक्रमाची माहिती व फोटो फिट इंडिया वेबसाईटवर www.fitindia.gov.in अपलोड करावी. या उपक्रमाचा विद्यार्थी, युवक-युवतीनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी यांनी केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ