जिल्ह्यातील आठ ग्रामपंचायतींत सार्वत्रिक निवडणुक; थेट सरपंचपदाचाही समावेश: 18 सप्टेंबरला मतदान तर 19 ला मतमोजणी


अकोला, दि.13(जिमाका)- राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील अकोट तालुक्यांतील सात व बाळापूर तालुक्यातील एक असे एकूण आठ ग्रामपंचायतींच्या सदस्य पदांसह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दि. 18 सप्टेंबर 2022 रोजी मतदान तर मतमोजणी दि. 19 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्याअनुषंगाने संबंधित ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी माहिती ग्रा.पं.,जि.प.,पं.स. निवडणुक विभागाव्दारे दिली.

जानेवारी 2021 ते मे 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या व जून 2022 ते सप्टेंबर 2022 कालावधीत मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींच्या तसेच नव्‍याने स्‍थापित ग्रामपंचायतीच्‍या सदस्य पदासह थेट सरपंच पदाच्या सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम घोषीत झाला आहे. त्यात अकोट तालुक्यातील पोपटखेड, धारगड, धारुर रामापुर, अमोना, सोमठाणा, कासोद शिवपुर व गुल्लरघाट असे एकूण सात ग्रामपंचायतींत तर बाळापूर तालुक्यातील व्याळा ग्रामपंचायत असे एकूण आठ ग्रामपंचायतींत सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. 

ग्रा.पं.निवडणूक कार्यक्रम याप्रमाणे:  संबधित तहसीलदार गुरुवार दि. 18 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील. नामनिर्देशनपत्रे बुधवार दि. 24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2022 या कालावधीत दाखल करतील. शासकीय सुट्टीमुळे 27, 28 व 31 ऑगस्ट 2022 रोजी नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार नाहीत. नामनिर्देशनपत्रांची छाननी शुक्रवार दि. 2 सप्टेंबर 2022 रोजी होईल. नामनिर्देशनपत्र मागे घेण्याची अंतिम मुदत मंगळवार दि. 6 सप्टेंबर 2022 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असेल. मतदान रविवार दि. 18 सप्टेंबर 2022 रोजी  सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत होईल. मतमोजणी व निकाल घोषीत करणे सोमवार दि. 19 सप्टेंबर 2022 रोजी होईल. 

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ