शेळीपालन व्यवसाय आर्थिक उन्नतीचा मार्ग- डॉ.अनिल भिकाने

 अकोला, दि.६(जिमाका)-प्रयोगशील नवतरुणांनी शास्त्रोक्त पद्धतीने शेळीपालन केल्यास त्यांच्या  कुटुंबाची आर्थिक घडी सावरण्यास नक्कीच उपयोगी ठरू शकेल, त्यामुळे शेळीपालन हा व्यवसाय आर्थिक उन्नतीचा मार्ग आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपुरचे संचालक-विस्तारशिक्षण, प्रा.डॉ.अनिल भिकाने यांनी केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत येथील स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था येथे राज्यस्तरीय आधुनिक शेळीपालन व्यवसाय प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले होते.

या प्रशिक्षणाच्या समारोप प्रसंगी डॉ. भिकाने बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. चैतन्य पावशे हे होते. प्रशिक्षणाचे उद्घाटन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ, प्रा. डॉ. संजय मंडकमाले यांचे हस्ते झाले. सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे हे अध्यक्षस्थानी होते. प्रास्ताविक विभाग प्रमुख प्रा. डॉ शैलेन्द्र कुरळकर यांनी केले. या प्रशिक्षणात शेळ्यांची पैदास, आहार, आरोग्य, दूध व मांस उत्पादन, मार्केटिंग व्यवस्थापन या विषयांवर तज्ज्ञांची व्याख्याने झाली.अलेम्बिक फार्मा लि. चे पी.करुणानिथी, डॉ. संतोष शिंदे, डॉ. सायली यांनी ऑनलाईन प्रशिक्षणाचे आयोजन केले.

राज्यभरातून ७० हून अधिक पशुपालक, शेळीव्यावसायीक, पशुधन पर्यवेक्षक, पशुसखी  प्रशिक्षणार्थी म्हणून सहभागी झाले होते. प्रशिक्षणाचे समन्वयक डॉ. प्रवीण बनकर आणि सहसमन्वयक डॉ. गिरीश पंचभाई, डॉ. कुलदीप देशपांडे, डॉ. प्राजक्ता कुरळकर तसेच नीलेश मेहेसरे व पदव्युत्तर विद्यार्थी डॉ. रागिनी कंकलवार, डॉ. शुभांगी शिंदे, डॉ. राहुल चव्हाण, डॉ. अजय घोळवे यांनी परिश्रम घेतले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना