स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; ‘घरोघरी तिरंगा’ अभियानात नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावे! -जिल्हाधिकारी निमा अरोरा


अकोला दि. 12(जिमाका)-  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान दि. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येत आहे. हा अभियान यशस्वी करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वजाची उभारणी स्वयंस्फूर्तने करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले. तसेच ही मोहिम राबविताना केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनाचे पालन करावे.

मार्गदर्शक सूचना याप्रमाणे :  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार घरोघरी तिरंगा कार्यक्रम दि. 13 ते 15 ऑगस्ट 2022 या कालावधीत राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या घरावर, तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था यांच्या इमारतीवर राष्ट्रध्वज स्वयंस्फूर्तीने उभारावी.  घरोघरी तिरंगा कार्यक्रमात दि. 13 ते 15 ऑगस्ट हे तीन दिवस ‘घरोघरी तिरंगा’ फडकवताना दररोज संध्याकाळी झेंडा खाली उतरावयाची आवश्यकता नाही. परंतु कार्यालयांना यासंबंधी ध्वज संहिता पाळावी लागेल, असे पत्राव्दारे कळविण्यात आले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ