कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत तीन पॉझिटीव्ह, दोन डिस्चार्ज

       अकोला दि.26(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 101 अहवाल प्राप्त झाले. त्यात दोघांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून तर खाजगी प्रयोगशाळेतून एक असा एकूण तीन जणांचा आरटीपीसीआर अहवाल पॉझिटीव्ह आला. तर दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 2 व खाजगी 1)3+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य =एकूण पॉझिटीव्ह 3.

आरटीपीसीआर ‘तीन

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुषांचा समावेश असून हे सर्व रुग्ण अकोला क्षेत्रातील रहिवाशी आहे. तसेच एका रुग्णाचा अहवाल हा खाजगी लॅब मधून प्राप्त झाला आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

दोन डिस्चार्ज

आज दिवसभरात दोन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘25

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65813(49683+15139+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 20 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील पाच रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 20 जणांना होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ