खाद्यतेल भेसळ विरोधी मोहिम; अकोला व वाशीम जिल्ह्यातून घेतले तेलाचे नमुने

 अकोला दि. 12 (जिमाका)- दैनंदिन जीवनात विविध अन्न  पदार्थ बनविण्याकरीता खाद्यतेलाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. जनतेला चांगल्या प्रतिचे खाद्यतेल मिळावे याकरीता अन्न व औषध प्रशासन विभागातर्फे खाद्यतेल भेसळ विरोधी मोहिम राबविण्यात येत आहे. या विशेष मोहिमेत खाद्यतेलाचे नमुने प्रयोगशाळेमार्फत तपासणी करीता घेण्यात येत असून गुरुवारी (दि.11) राबविण्यात आलेल्या मोहिमेत अकोला व वाशीम जिल्ह्यातून तेलाचे नमुने घेण्यात आले आहेत.

या मोहिमेअंतर्गत, अन्न सुरक्षा प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी दिलेल्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात खाद्यतेलाचे व वनस्पतीचे तसचे मल्टी सोर्स ईडीबल ऑईल (एमएसईओ) च्या अनुषंगाने सर्व्हेक्षण मोहिम राबविण्यात येत आहे. या कालावधीत स्थानिक व नामांकित मोठ्या ब्रँडसचे देखील खाद्यतेलाचे नमुने सर्वेक्षणासाठी घेऊन विश्लेषण करण्यात येणार आहे. मल्टी सोर्स डी -ईडीबल ऑईल (एमएसईओ) ची विक्री एगमार्क लायसेन्स  शिवाय करता येत नाही. याबाबतही तपासणी होणार आहे. सुट्या खाद्यतेल विक्रीस प्रतिबंध असून सुटे खाद्यतेल विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.

या मोहिमेंतर्गत दि. 11 रोजी अकोला व वाशिम जिल्ह्यात खाद्यतेलाचे असे एकूण 10 सर्वेक्षण नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. या नमुन्यांचे विश्लेषण अहवाल प्राप्त होताच नियमित अन्न नमुने घेऊन पुढील कारवाई करण्यात येईल असे सहायक आयुक्त (अन्न), अन्न व औषध प्रशासन विभाग सागर तेरकर यांनी कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना