स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव; बँड पथकाव्दारे देशभक्तीपर गीतवादन
अकोला, दि.15(जिमाका):-
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त शहरातील मुख्य ठिकाणी बँड पथकाव्दारे देशभक्तीपर
गीत वादनाव्दारे जनजागृती करण्यात आली. यावेळी मोठया संख्येने नागरिकांची उपस्थिती
होती.
पोलीस
बॅण्ड पथक व संकल्प प्रतिष्ठान ढोलताशा पथक यांच्या संयुक्त विद्यमाने टॉवर चौक येथे कार्यक्रम
पार पडला. शहरातील मुख्य ठिकाणी अशोक वाटीका चौक, रेल्वे स्टेशन चौक, रतनलाल प्लॉट चौक, हुतात्मा चौक, सिव्हील लाईन चौक, भगतसिंग चौक व गांधी चौक येथे देशभक्तीपर गित वादन कार्यक्रम सादर करण्यात आले. वादन कार्यक्रमाने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
000000
.jpeg)
.jpeg)
.jpeg)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा