कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत दोन पॉझिटीव्ह, तीन डिस्चार्ज


      अकोला दि.19(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 120 अहवाल प्राप्त झाले. त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर तीन जणांला डिस्चार्ज देण्यात आले आहे, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 2 व खाजगी 0)2+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य =एकूण पॉझिटीव्ह 2.

आरटीपीसीआर ‘दोन’

आज दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महिलांचा समावेश असून ते रुग्ण मुर्तिजापूर तालुक्यातील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

तीन डिस्चार्ज

आज दिवसभरात तीन रुग्णास डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘26

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65794(49665+15138+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 26 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील तीन रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 23 जणांना होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ