कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत पाच पॉझिटीव्ह


      अकोला दि.23(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 122 अहवाल प्राप्त झाले. त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 5 व खाजगी 0)5+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य =एकूण पॉझिटीव्ह 5.

आरटीपीसीआर ‘पाच’

आज दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात तीन पुरुष व दोन महिलांचा समावेश असून हे सर्व रुग्ण अकोला क्षेत्रातील रहिवाशी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘27

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65807(49678+15138+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 27 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील दोन रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 25 जणांना होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ