सप्टेंबर महिन्यासाठी जीवनावश्यक वस्तू वाटप परिमाण निश्चित


अकोला, दि. 24(जिमाका)- जिल्ह्याकरीता माहे सप्टेंबर महिन्यासाठी  लक्ष्य निर्धारीत सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्नधान्य, नियंत्रित साखर इ. जीवनावश्यक वस्तूंचे वाटप परिमाण निश्चित करण्यात आले आहे.

वाटप परिमाण व दर याप्रमाणे-

१.      प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी गहू दोन किलो प्रतिव्यक्ती,दर दोन रुपये प्रति किलो.

२.      प्राधान्य गटातील लाभार्थ्यांसाठी तांदूळ तीन किलो प्रतिव्यक्ती, तीन रुपये प्रति किलो.

३.      अंत्योदय अन्न योजना गहू- 15 किलो प्रति कार्ड, दोन रुपये प्रति किलो.

४.    अंत्योदय अन्न योजना तांदूळ- 20  किलो प्रति कार्ड, तीन रुपये प्रति किलो.

५.     एपीएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्यांकरीता गहू-चार किलो प्रति व्यक्ती, दोन रुपये प्रति किलो.

६.      एपीएल शेतकरी कुटुंब लाभार्थ्यांकरीता तांदूळ- एक किलो प्रति व्यक्ती, तीन रुपये प्रति किलो.

७.     नियंत्रित साखर अंत्योदय लाभार्थ्यांकरीता-एक किलो प्रति शिधापत्रिका, 20 रुपये प्रतिकिलो.

८.     प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत  प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी गहू, तांदूळ- प्रतिसदस्य  

     प्रतिमाह दोन किलो गहू, तीन किलो तांदूळ (मोफत)

९.      प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत  अंत्योदय अन्न योजना गहू व तांदूळ- प्रतिसदस्य प्रतिमाह एक

    किलो गहू, चार किलो तांदूळ (मोफत)

हे वाटप परिमाण गोदामातील साठ्याच्या व लाभार्थ्यांच्या संख्या उपलब्धतेनुसार राहील,असे जिल्हा पुरवठा अधिकारी बी. यु. काळे यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ