महिलांकरीता निवासी प्रशिक्षण; रविवारी(दि.7) चाळणी परिक्षा
अकोला,दि.5(जिमाका)- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता
विभागाने केंद्र व राज्य पुरस्कृत संकल्प योजनेअंतर्गत युवती व महिलांकरीता 18 महिण्याचे
निशुल्क निवासी प्रशिक्षण होणार आहे. या प्रशिक्षणाकरीता चाळणी परिक्षा होणार असून
प्रशिक्षणासाठी प्रवेश पूर्व ऑफलाईन परिक्षा रविवार दि. 7 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील
सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक युवती
व महिलांनी परिक्षेकरीता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य, रोजगार, उद्योजकता
व नाविन्यता विभागाचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी केले.
अमरावती नागपूर महसूल विभागातील
17 ते 29 वयोगटातील किमान 12 वी उत्तीर्ण अथवा आयटीआय उत्तीर्ण 200 युवती व महिलांकरीता
नवगुरुकुल फाउंडेशन फॉर सोशल वेल्फेअर यासंस्थेव्दारे ॲडव्हान्स डिप्लोमा इन सॉप्टवेअर
प्रोग्रामिंगचे 18 महिण्याचे निशुल्क निवासी प्रशिक्षण डॉ. पंजाबराव देशमुख प्रबोधिनी,
अमरावती येथे पथदर्शी प्रकल्प म्हणून राबविण्यात येणार आहे. या प्रशिक्षणाकरीता
प्रशिक्षणार्थीची निवड जिल्हाधिकारी व नवगुरुकुल फाऊंडेशन यांनी प्रमाणित केलेल्या
विहीत निवड प्रक्रीयेव्दारे करण्यात येणार आहे. याकरीता चाळणी परिक्षा घेण्यात येणार
असून प्रशिक्षणासाठी प्रवेश पूर्व ऑफलाईन
परिक्षा रविवार दि. 7 ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था
येथे आयोजित करण्यात आली आहे.
परीक्षेबाबत सूचना
:
अर्जात निवड केलेल्या जिल्ह्यातील
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला या परिक्षा केंद्रावर परीक्षेच्या एक तास
आधी म्हणजेच सकाळी 10 वाजता उपस्थित
राहावे. उमेदवारांनी वैध फोटो आयडी सोबत ठेवणे आवश्यक राहिल. परीक्षेकरीता काळा किंवा
निळा यापैकी एकाच रंगाच्या पेनाचा वापर करावा. मोबाईल, कॅल्क्युलेटर, स्मार्ट वॉच
अथवा इतर कुठलीही इलेक्ट्रानिक्स साधन परीक्षा केंद्रामध्ये आणण्यास सक्त मनाई राहिल.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा