कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत शुन्य पॉझिटीव्ह


      अकोला दि.22(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजे पर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 25 अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 0 व खाजगी 0)0+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य =एकूण पॉझिटीव्ह 0.

आरटीपीसीआर ‘शुन्य’

आज दिवसभरात  आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

सक्रिय रुग्ण ‘22

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65802(49673+15138+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 22 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील तीन रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 19 जणांना होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत,अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ