घरोघरी तिरंगाः महिला व बालविकास विभागातर्फे जनजागृती रॅली


अकोला, दि.14(जिमाका):- ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानाच्या जनजागृतीसाठी आज शहरातील मुख्य मार्गांवरुन महिला व बाल विकास विभागाच्या वतीने रॅलीद्वारे प्रचार केला. या रॅलीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने व मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली.

जिल्हा परिषदपासून आज रॅली सुरु झाली. यामध्ये गायत्री बालिकाश्रम, सुर्यादय बालगृह, महिला राजगृह व शासकीय बालगृहातील बालक/बालीका व महिलांचा सहभाग होता. यावेळी शैक्षणिक महिला व बाल कल्याण सभापती स्पुर्ती गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष ॲड. अनिता गुरव, बाल कल्याण समितीचे सदस्य राजेश देशमुख, बाल न्याय मंडळाचे सदस्य ॲड. वैशाली गावंडे, ॲड. सारिका घिरणीकर, परिविक्षा अधिकारी गिरीश पुसदकर, माधवी मोरे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजु लाडुलकर आदी उपस्थित होते.  ही रॅली जिल्हा परिषदेपासून सुरु होवून अशोक वाटीका, नेहरु पार्क, इनकम टॅक्स मार्गे गोरक्षण संस्था येथे रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीमध्ये बालगृहातील बालकांनी विविध वेशभुषा करुन देशभक्तीपर नारे दिले. कार्यक्रम यशस्वीकरीता जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे सुनिल सरकटे, सुनिल लाडुलकर, नितीन अहिर, सतिश राठोड, सचिन घाटे, चाईल्ड लाईनचे हर्षाली गजभीये, सखी वन्स स्टॉप सेंटरच्या ॲड. मनिषा भोरे यांनी परिश्रम घेतले.  

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ