घरोघरी तिरंगाः जनजागृतीसाठी युवकांची रिले दौड
अकोला, दि.६(जिमाका):- ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान देशात सर्वत्र दि.१३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या जनजागृतीसाठी आज अकोला शहरातील प्रमुख मार्गांवरुन युवक युवतींची रिले दौड आयोजीत करण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयापासून आज
सकाळी दहा वा. ही दौड सुरु झाली. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय
अधिकारी डॉ. निलेश अपार, गजानन महल्ले, जिल्हा क्रीडा अधिकारी गणेश कुलकर्णी आदी मान्यवर यावेळी उपस्थित
होते. या रिले दौडला मान्यवरांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवण्यात आली. ही दौड जिल्हाधिकारी
कार्यालयासमोरुन निघून अशोक वाटीका, सिव्हिल लाईन रस्त्यावरुन, बारा ज्योतिर्लिंग
मंदीर, जठारपेठ चौक, सातव चौक, रेल्वेस्टेशन, शिवाजी महाविद्यालय मार्गे अशोक
वाटीका व फ्लाय ओव्हर पुलावरुन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय येथे या दौडचा
समारोप करण्यात आला. या दौडने आज नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. शहरातील प्रमुख
मार्गांवरुन जातांना हे युवक युवती भारत माता की जय च्या घोषणा देत होते. त्यांना
नागरिक प्रतिसाद देत होते. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात
राष्ट्रगिताने या दौडचा समारोप करण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा