कोविडःआरटीपीसीआरमध्ये 53 पॉझिटिव्ह, तिघांचा मृत्यू, 192 डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेन दोन पॉझिटीव्ह
अकोला दि .31( जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून ( सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे ( आरटीपीसीआर) 152 अहवाल प्राप्त झाले. त्यात 41 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले, तसेच खाजगी लॅब मधून 12 असे एकूण 53 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले . तर 192 जणांना डिस्चार्ज देण्यात आले, तसेच तिघांचा मृत्यूची नोंद झाली, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. दरम्यान काल (दि. 30 ) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 6 40 57 ( 4 83 42 + 148 9 8 +8 17 ) झाली आहे , अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे. आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर (शा.वै.म. 41 व खाजगी 1 2 ) 53 + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 2 = एकूण पॉझिटीव्ह 55 . शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार , आजपर्यंत एकूण 361100 नमुने तपासण...