राष्ट्रीय एकता दौडला उत्स्फुर्त प्रतिसाद ; जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दाखविली हिरवी झेंडी
अकोला, दि . 31 (जिमाका)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त आज गुरुवार, दि.31 रोजी ‘रन फॉर युनिटी’ अर्थात राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय एकता दौडला शहरातील नागरीकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी दर वर्षी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा प्रशासनाच्या वतीने राष्ट्रीय एकता दिवस साजरा करण्यात येतो, यानिमीत्य 'रन फॉर युनिटी'चे आयोजन करण्यात आले होते. या दौडचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, शिक्षणाधिकारी प्रकाश मुकूंद, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता संजयकुमार अवस्थी, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम, तहसिलदार विजय ...