शहीद जवान निलेश धांडे यांचे पार्थिवावर वरुर जऊळका येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अकोला,दि.4(जिमाका)- वरुर जऊळका ता. अकोट येथील रहिवासी असलेले भारतीय सीमा रस्ते संघटनमधील शहीद सैनिक निलेश प्रमोद धांडे यांचे पार्थिवावर त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी उपस्थित नागरिकांनी साश्रुनयनांनी या वीर जवानास अखेरचा निरोप दिला.
शहीद
निलेश धांडे हे नागालँडच्या दिमापूर शहर सीमेजवळ सिमा रस्ते संघटनच्या ग्रिप पायलर
या पदावर सन 2013 पासून कार्यरत होते. नागालँड येथे
कर्तव्यावर असताना त्यांना वीरमरण आले. त्यांचे पार्थिव सोमवारी (दि.4) विशेष विमानाने नागालँड येथून नागपूर व नागपूर येथून विशेष वाहनाने
मुळगावी आणण्यात आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, दिड वर्षाचा मुलगा व पत्नी असा परिवार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा