पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

 अकोला,दि.२२(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शनिवार  दि. २३ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शनिवार दि.२३ रोजी सकाळी दहा वा. संत पुंडलिक महाराज संस्थान, सिरसो ता. मुर्तिजापूर येथे भेट.सकाळी पावणे अकरा वा. मौजे जांभा बु. पुनर्वसित (काटेपूर्णा बॅरेज) गावाला भेट व आढावा, स्थळ- जांभा बु., दुपारी पाऊण वा.  लायन्स क्लब अकोला तर्फे कार्डियाक डायग्नोस्टिक आणि ऑपरेटीव्ह कॅम्प येथे उपस्थिती, स्थळ- ओझोन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, अकोला. दुपारी पावणे दोन वा.  राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा विस्तारीकरण भुसंपादनाबाबत बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने, तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१  विस्तारीकरण शेतजमिन भुसंपादनाबाबत आढावा सभा, स्थळ- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. दुपारी तीन वा.  बिगरसिंचन पाणी आरक्षणाबाबत आढावा सभा, स्थळ- नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला. दुपारी चार नंतर सवडीने  अमरावतीकडे प्रयाण.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ