महाकृषी ऊर्जा अभियान;सौर कृषी पंप योजनाचा लाभ घ्या


 

अकोला,दि.14 (जिमाका)- महाकृषी उर्जा अभियान अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांकरीता सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्या, असे आवाहन विभागीय महाव्यस्थापक प्रफुल्ल तायडे यांनी केले.   

योजनेची वैशिष्ट्ये :  पारेषण विरहित 2750 सौर कृषी पंप, शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार, शेतकऱ्यांना धारण क्षमतेनुसार 3 एच. पी. डी. सी., 5 एच. पी. डी. सी. व 7.5 एच. पी. डी. सी. अश्वशक्ती सौर पंप उपलब्ध होणार, सर्वसाधारण वर्गवारीच्या लाभार्थ्यांचे कृषी पंप किंमतीच्या 10 टक्के तर अनुसूचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना पाच टक्के हिस्सा.

लाभार्थी निवडीचे निकष : विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी ई. तसेच शाश्वत पाण्याच्या स्रोत उपलब्ध असणारे शेतकरी, पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी, अटल सौर कृषी पंप योजना टप्पा एक व दोन किंवा मुख्यमंत्री सौर कृषी योजने अंर्तगत अर्ज केलेले तथापि मंजूर न झालेले अर्जदार शेतकरी, अडीच एकर शेतजमीन धारकास तीन एच.पी.डी.सी., पाच एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास पाच एच.पी.डी.सी  व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास साडेसात एच.पी.डी.सी.  क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय.

या योजनेच्या सविस्तर माहिती व ऑनलाईन नोंदणीसाठी  http://kusum.mahaurja.com/ solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Componenet-B    www.mahaurja.com  या संकेतस्थळावर तसेच अधिक माहितीसाठी महाऊर्जा, विभागीय कार्यालय, अमरावती येथे व दुरध्वनी क्र. 07212661610 व ई-मेल:  domedaamravati@mahaurja.com वर संपर्क साधावा.   

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ