शाळा व महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्याशी साधला संवाद; लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश द्या- जिल्हाधिकारी यांचे आवाहन

 



अकोला. दि.20(जिमाका)- कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी लसीकरण करणे आवश्यक असून याकरीता प्रशासनाव्दारे विविध उपाययोजना राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालय सुरु झाले आहे. त्याअनुषंगाने शाळा व महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्याशी दुरदृष्य प्रणालीव्दारे संवाद साधून लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश द्या, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज केले.

शाळा व महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्याची दुरदृष्य प्रणालीव्दारे संवाद साधताना जिल्हाधिकारी बोलत होत्या. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक वंदना पटोकार-वसो, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, माता व बाल विकास अधिकारी डॉ. मनिष शर्मा, मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अस्मिता पाठक, मनपाचे डॉ. अनुप चौधरी तर दुरदृष्य प्रणालीव्दारे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाचे प्राचार्य, उपविभागीय अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, आदी उपस्थित होते.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाव्दारे बुधवार (दि.20) पासून सर्वत्र महाविद्यालय सुरु करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. कोविड संसर्गाचा धोका लक्षात घेता सर्व यंत्रणा व महाविद्यालयाने शासनाच्या मार्गदर्शक सूचनेचे पालन करणे आवश्यक आहे. त्यासंबंधित जिल्हाधिकारी यांनी शाळा व महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्याशी संवाद साधून लसीकरण  झालेल्या विद्यार्थ्यांनाच महाविद्यालयात प्रवेश द्यावे. याकरीता संबंधित विद्यार्थ्यांकडे लसीकरण प्रमाणपत्र असल्याची खात्री करा व लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश देवू नये. लसीकरण न झालेल्या विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याकरीता प्रोत्साहित करुन  त्यांच्याकरीता लसीकरण शिबीराचे आयोजन करा. याकरीता प्रशासन सर्वतोपरी मदत करेल. सोबतच विद्यार्थ्यांच्या पालकांचे लसीकरण झाले असल्याबाबत त्यांच्याकडून माहिती घ्या. लसीकरण न झालेल्या पालकांना लसीकरणाकरीता आवाहन करा. महाविद्यालयात शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार सर्व उपाययोजना राबवा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ