कोविड लसीकरणासाठी आजपासून मिशन कवच कुंडल अभियान; दररोज 20 हजारांहून अधिक लसीकरणाचे उद्दिष्ट

 



        अकोला,दि.7(जिमाका)- : जिल्ह्यात कोविड-19 लसीकरणाला गतीमान करण्यात येत आहे. त्यासाठी शुक्रवार दि. 8 ते 14 ऑक्टोबर यादरम्यान ‘मिशन कवच कुंडल अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानात जिल्ह्यात दररोज 20 हजारांहून अधिक लसीकरण करण्याचे उद्दिष्ट  ठरविण्यात आले आहे. या अभियानात अधिकाअधिक नागरिकांनी कोविड लसीकरण करुन घ्यावे, असे   आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी यांनी केले आहे.

            यासंदर्भात आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात कोविड लसीकरणाबाबतची बैठक झाली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी डॉ. वंदना पटोकार-वसो, माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. मनिष शर्मा, पातूरचे मुख्यधिकारी स्नेहल रहाटे, बाळापूरचे प्रदीप चोरे, अकोटचे एस.एन. वाहुरवाघ, मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ.अस्मिता पाठक, प्राथमिक आरोग्य अधिकारी, लसीकरण नोडल अधिकारी आदि उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्देश दिल की, जिल्ह्यात दि. 8 ते 14 ऑक्टोबर दरम्यान  मिशन कवच कुंडल अभियान राबवावयाचे आहे.  या मोहिमेच्या यशस्वीतेकरीता जिल्ह्यात लसीकरण केंद्रांची संख्या वाढविण्यात यावी.  तसेच आशा व अंगणवाडी सेविका यांच्याव्दारे घरोघरी सर्व्हेकरुन लसीकरण न करणाऱ्यांना नागरिकाना लसीकरण करुन घेण्यास प्रोत्साहित करावे. तसेच जिल्ह्यामध्ये शाळा सुरु झाली असून प्रत्येक शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या आई-वडीलांना लसीकरण करण्याबाबत आवाहन करावे, असे निर्देश त्यांनी शिक्षण विभागाना दिले. उत्सव काळात कोरोना विषाणूचा फैलाव होण्याची शक्यता लक्षात घेता लसीकरण गतीमान करणे आवश्यक आहे. तसेच शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करुन लसीकरण केंद्रसंख्या वाढवावी. तसेच असेही त्यांनी सांगितले.

0000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ