महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना; 15 नोव्हेंबरपर्यंत आधार प्रमाणीकरण करण्याचे आवाहन


अकोला,दि.18(जिमाका)- महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्यात येत आहे. कर्जमुक्ती होण्याकरीता विशिष्ट क्रमांक प्राप्त लाभार्थ्यांना आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही अशा खाताधारक शेतकऱ्यांकरीता    दि. 15 नोव्हेंबरपर्यंत विशेष मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सहकारी संस्थाचे जिल्हा उपनिबंधक यांनी केले आहे.

योजनेअंतर्गत जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, व्यापारी बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ग्रामीण बँक यांचेमार्फत 1 लक्ष 16 हजार 544 कर्जखाती पोर्टलवर आजपर्यत अपलोड करण्यात आलेली असुन त्यापैकी 1 लक्ष 4 हजार 369 खात्यांना विशिष्ट क्रंमाक पोर्टलवर प्राप्त झाला आहे. त्यापैकी 1 लक्ष 2 हजार 411 खातेदार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले असून त्यातील 1 लक्ष 225 खात्यावरील रु.628.17 कोटीची कर्जमुक्तीची रक्कम संबधीत खात्यावर जमा करण्यात आली आहे.  उर्वरित खात्यांवरील रक्कम जमा करण्याच्या प्रक्रियेत आहे. तसेच आधार प्रमाणीकरण न झाल्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील 1958 खात्यांधारक शेतकरी कर्जमुक्ती योजनेपासून वंचीत आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरीता सहकार विभागामार्फत दि.15 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यात संबंधित शेतकरी यांच्याशी जिल्ह्यातील सर्व सरकारी यंत्रणा ईतर संस्था यांच्या मदतीने संपर्क साधून आधार प्रमाणीकरण करण्यात येणार आहे.

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यांना विशिष्ट क्रंमाक प्राप्त झाला आहे. त्यापैकी ज्या खातेदार शेतकऱ्यांनी आजपर्यत आधार प्रमाणीकरण केले नाही त्या शेतकऱ्यांनी ते ज्या ठिकाणी राहत असतील तेथील नजिकच्या सेवा केंद्राला भेट देवुन आपला कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण करुन योजनेचा लाभ घ्यावा. शेतकऱ्याकरीता अंतिम संधी असून त्याचा लाभ घ्यावा. यात काही अडचण किंवा शंका असल्यास आपली बँक शाखा अथवा जिल्ह्यातील कोणत्याही सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.       

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ