लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्या - जिल्हाधिकारी निमा अरोरा

 


अकोला,दि.14(जिमाका)-  महिला आर्थिक विकास महामंडळ, कौशल्य विकास विभाग, कृषी विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शासनाच्या विविध योजनाची माहिती व्हावी, याकरीता शासकीय योजनांची जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये महिला बचत गट तसेच उद्योग करु इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी शासनाच्या विविध योजनाची सविस्तर माहिती घेवून आवश्यक ते सर्व दस्तऐवाजांची पूर्तता करून स्वयंप्रेरणेने योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात जनजागृतीपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सौरव कटियार, जिल्हा अग्रणी बँकेचे आलोक तरोनिया, कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे डि.एल ठाकरे, माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे, जिल्हा उद्योग केंद्राचे समन्वयक  रत्नपारखी,  खादी ग्रामोद्योगचे नंदा लव्हाळे, कृषी विभागाच्या ज्योती चोरे, महिला बचत गटाचे सदस्य, बेरोजगार युवक-युवती आदि उपस्थित होते.

            शासकीय व निमशासकीय यंत्रणेव्दारे समाजातील विविध घटकासाठी शासनाव्दारे विविध योजना राबविल्या जातात. या योजना गरजू व्यक्तीपर्यंत पोहचवून त्यांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी या योजनाची माहिती होणे आवश्यक आहे. अशा कार्याशाळेच्या माध्यमातून सर्वांना शासनाच्या योजनाची माहिती होण्यास मदत होणार आहे. उद्योग करु इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांनी शासनाच्या योजनाची माहिती घेवून जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले. तसेच शासनाच्या विविध योजना शासकीय व निम शासकीय यंत्रणेने गरजुवंताना योजनाची माहिती व्हावी यासाठी जनजागृती करुन त्यांना योजनाची सविस्तर माहिती द्यावी. याकरीता त्यांना आवश्यक ती सर्व मदत करा, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी  सबंधिताना दिले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वय अधिकारी वर्षा खोब्रागडे यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा व्यवस्थापक महल्ले यांनी केले. तसेच सबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी आपापल्या विभागाच्या योजनांची माहिती दिली.

000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ