विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत विविध योजनांकरीता 30 कोटी 23 लक्ष 77 हजार निधी वितरीत

अकोला,दि.5(जिमाका)-  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाव्दारे राबविण्यात येणाऱ्या विशेष सहाय्य कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध योजनांकरीता 30 कोटी 23 लक्ष 77 हजार 400 रुपये तालुकास्तरावर वितरीत करण्यात आले आहे.

वितरीत अनुदानाचे विवरण याप्रमाणे- संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारणकरीता 5 कोटी 71 लक्ष 44 हजार, संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसुचित जातीकरीता 1 कोटी 52 लक्ष 15 हजार, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना सर्वसाधारणकरीता 18 कोटी 40 लक्ष 42 हजार 800 तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अनुसुचित जाती करीता 4 कोटी 59 लक्ष 75 हजार 600 रुपये योजनांकरीता माहे जुलै ते सप्टेंबर 2021 पर्यंतचे अनुदान शासनाकडुन जिल्हा कार्यालयास प्राप्त झाले आहे. प्राप्त अनुदान तालुकास्तरावर वितरीत करण्याची कार्यवाही सुरु आहे. या योजनांचे अनुदान लवकरच संबंधित लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याची कार्यवाही तालुकास्तरावरुन करण्यात येईल, असे तहसिलदार (संगायो) यांनी कळविले आहे.

0000000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ