पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्य व्यवसायाकरीता किसान कार्ड योजना

अकोला,दि.5(जिमाका)- पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि कुक्कटपालन व्यवसायाकरिता  किसान कार्ड योजना अभियान राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ घेण्याकरिता जवळच्या राष्ट्रीयकृत किंवा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेमध्ये दि. 7 ते दि. 15 पर्यंत  संपर्क साधावा. तसेच योजनेअंतर्गत व्याजदर सात टक्के असुन नियमित परतफेड करणाऱ्यांना व्याजदरात दोन टक्के सवलत देण्यात येणार आहे. पशुसंवर्धन, दुग्ध, मत्स्य कुक्कटपालन व्यवसायकांनी या योजनेचे लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी तसेच सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया (लिड) बँकचे जिल्हा अग्रेणी प्रंबधक, सहकारी संस्था जिल्हा उपनिबंधक अकोला यांनी केले आहे.

00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम