कोविड निर्बंध; हॉटेल्स रेस्टॉरंट्स, दुकानांसाठी नियमावली

अकोला, दि.२३(जिमाका)- कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने लावण्यात आलेले  लेव्हल तीन च्या सुचनांप्रमाणे असलेले निर्बंध टप्प्या टप्प्याने शिथिल करण्यात  येत आहेत. त्याअनुषंगाने हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, खाद्यगृहे हे शुक्रवार दि.२२ च्या रात्रीपासून रात्री १२ वाजेपर्यंत  तर दुकाने, शॉपिंग मॉल्स, प्रतिष्ठाने यांना रात्री ११ वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची मुभा जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केलेल्या आदेशान्वये देण्यात आली आहे.

आदेशात नमूद अटी व शर्ती याप्रमाणे-

१.      सर्व प्रकारचे  दुकाने, प्रतिष्‍ठाने,  रेस्‍टॉरेन्‍ट , हॉटेल्‍स इत्‍यादी विविध आस्‍थापनामध्‍ये  काम करणाऱ्या  मालक, कामगार, कर्मचारी यांनी कोविड-१९ चा प्रादुर्भाव  व फैलाव होवू  नये  या करिता लसीकरण करुन घ्‍यावे. 

२.      सुरु करण्‍यात आलेल्‍या आस्‍थापना यांनी  कोविड-१९ संदर्भातील केन्‍द्र शासनाच्‍या व राज्‍य शासनाच्‍या कोणत्‍याही निर्बंधाचा भंग होणार नाही याची खबरदारी घ्‍यावी.

३.      निश्चित करण्‍यात आलेल्‍या  मार्गदर्शक तत्‍वांचा भंग झाल्‍याचे  निदर्शनास आल्‍यास संबंधितांविरुध्‍द नियमानुसार संबंधीत प्रशासकीय यंत्रणेकडून कारवाई करण्‍यात येईल.  

४.    कोविड-१९ विषाणूंच्‍या  प्रादुर्भावास  प्रतिबंध करण्‍यासाठी शासनाने तसेच  या कार्यालयाने वेळोवेळी निर्गमित केलेल्‍या आदेशातील बंधनकारक असणाऱ्या सूचना  लागू राहतील.                         

५.    कोविड-१९ च्‍या व्‍यवस्‍थापनाबाबतचे  राष्‍ट्रीय निदेश  तसेच गृह कार्य मंत्रालय, आरोग्‍य व कुटूंब कल्‍याण  मंत्रालय, महाराष्‍ट्र शासन इत्‍यादींनी जारी केलेली संबंधित मार्गदर्शक तत्‍वे  यांचे सर्व कार्यामध्‍ये  व व्‍यवहारामध्‍ये कोटेकोरपणे  पालन करण्‍यात यावे, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आपल्या आदेशात नमूद केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ