कोविडः आरटीपीसीआर व रॅपिड ‘निरंक’
अकोला,दि.24(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे
(आरटीपीसीआर) 187 अहवाल प्राप्त झाले. त्यात कुणाचाही अहवाल
निगेटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.23) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण
संख्या 57882(43275+14430+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर शुन्य + रॅपिड
ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह शुन्य
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त
माहितीनुसार, आजपर्यंत एकूण
327548 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक
तपासणीचे 323914 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3232 नमुने होते. आजपर्यंत एकूण 327548 अहवाल
प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 284273 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
शुन्य पॉझिटीव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआर
व रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यातही कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, याची नोंद घ्यावी.
12 जणांवर
उपचार सुरु
जिल्ह्यात
एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57882(43275+14430+177) आहे.
त्यात 1139 मृत झाले आहेत. तर 56731 जणांना डिस्चार्ज
देण्यात आला असून सद्यस्थितीत 12 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली
आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 180 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग
चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.23) दिवसभरात झालेल्या 180 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाहीअहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात
आली. काल दिवसभरात अकोला महानगरपालिका येथे 130, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्याचे तीन, शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयात 38, हेगडेवार लॅब
येथे नऊ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे एकूण 180 चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.
00000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा