शनिवारपासून दि.23,24व 25रोजी जी.डी.सी.ॲण्ड ए.ची परिक्षा

 


अकोला,दि.18(जिमाका)- सहकार व लेखा पदविका मंडळाकडून(जी.डी.सी. ॲण्ड ए.बोर्ड) घेण्यात येणारी जी.डी.सी. ॲण्ड ए. व सहकार गृहनिर्माण व्यवस्थापन प्रमाणपत्र (सी.एच.एम.) परिक्षा-2020 कोविड संसर्गामुळे अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. ही परिक्षा शनिवारपासून दि.23,24 व 25 ऑक्टोंबर 2021 रोजी घेण्यात येणार आहे. या परिक्षेकरिता ऑनलाईन अर्ज भरलेल्या परिक्षार्थींनी जी.डी.सी. ॲण्ड ए. व सी.एच.एम. परिक्षेचे हॉल तिकीट जनरेट झालेले आहे. तरी परिक्षार्थींनी https://gdca.maharashtra.gov.in/  या पोर्टलवरुन स्वत:च्या लॉगीन आयडीवरुन हॉल तिकिट प्रिंट करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थाचे सहाय्यक निबंधक एस.डब्ल्यु खाडे यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ