लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांनाच होणार धान्य वितरण




अकोला. दि.18(जिमाका)- कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी दिवाळीच्या आत अधिकाधिक लोकांचे लसीकरण होण आवश्यक आहे. याकरीता सर्व यंत्रणेनी प्रयत्न करुन लसीकरणाचा वेग वाढवा. लसीकरण वाढविण्यासाठी शहरी व ग्रामीण भागातील स्वस्त राशन केंद्रावरुन लसीकरण झालेल्या लाभार्थ्यांनाच धान्य वितरीत करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांना दिले.

जिल्ह्यातील कोविड लसीकरण सद्यस्थितीबाबत  आज आढावा घेण्यात आला. याबैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, माता व बाल विकास अधिकारी डॉ. मनिष शर्मा, महिला व बाल विकास अधिकारी विलास मरसाळे, मनपाचे वैद्यकीय अधिकारी अस्मिता पाठक, तसेच नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तहसिलदार, प्राथमिक आरोग्य अधिकारी आदी उपस्थित होते.

आढावा बैठकीत जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले की, लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आशा, अंगणवाडी व शिक्षकाच्या माध्यमातून लसीकरण मोहिम वेगाने वाढवावी. याकरीता शिक्षकांनी जी मुले शाळेत येतात यांच्या पालकांनी लसीकरण केल्याबाबत खात्री करावी, 18 वर्षे वयाच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश द्यावे. आशा व अंगणवाडी सेविका ग्रामीण भागात प्रत्यक्ष भेटी दिल्याचे त्या त्या गावातील सरपंचाकडून खात्री करावी. ज्या ठिकाणी लोकसंख्या जास्त आहे व लसीकरण झालेले नाही अशा ठिकाणी लसीकरण केंद्र वाढवावे. जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचारी व त्यांचे पात्र गटातील कुटुंब सदस्य यांचे लसीकरण झाल्याबाबत खातरजमा करा. ग्रामीण व शहरी भागातील दुकाने, उद्योग इ. ठिकाणी लसीकरणाबाबत पाठपुरावा करा. नोडल अधिकारी यांनी तालुकास्तरावर थेटी देवून लसीकरणाबाबत आढावा घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

यावेळी संजय खडसे यांनी सांगितले की, जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढविणे हे तिसरी लाट थोपविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. जिल्ह्यात लसीकरणासाठी पुरेसे डोस उपलब्ध होत आहेत. तालुका पातळीवर लसीकरणाचे नियोजन करुन उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी आढावा घ्यावा.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ