कोविडःआरटीपीसीआर मध्ये एक पॉझिटीव्ह तर रॅपिड ‘निरंक’

 अकोला,दि.23(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 208 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 207 अहवाल निगेटीव्ह आले, तर एक जण पॉझिटीव्ह आले तर दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.22) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57882(43275+14430+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह एक

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 327361 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 323727 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3232 नमुने होते. आजपर्यंत एकूण 327361 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 284086 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

एक पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका पुरुषाचा समावेश असून  ते मुर्तिजापूर येथील रहिवाशी आहे.  तसेच रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यातही कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, याची नोंद घ्यावी.

दोघांना डिस्चार्ज

आज दिवसभरात  होम आयसोलेशन येथील दोघांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

12 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57882(43275+14430+177) आहे. त्यात 1139 मृत झाले आहेत. तर 56731 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 12 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 114 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.22) दिवसभरात झालेल्या 114 चाचण्या झाल्या त्यात कुणाचाहीअहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली. काल दिवसभरात अकोला महानगरपालिका येथे 62, जिल्हा आरोग्य कर्मचाऱ्याचे चार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 43,  हेगडेवार लॅब येथे पाच चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे एकूण 114 चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,  असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ