जि.प.व पं.स.पोटनिवडणुक: क्षेत्रीय अधिकारी यांना कार्यकारी दंडाधिकारी म्हणून घोषीत
अकोला, दि.2(जिमाका)- जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. या क्षेत्रातील निवडणूक अधिकारी यांचेकडून निवडणुक विषयक विविध जबाबदारी पार पाडण्याकरीता क्षेत्रीय अधिकारी व सहायक क्षेत्रीय अधिकारी यांना फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (129)(133)(143)(144) अन्वये जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक कालावधीकरीता कार्यकारी दंडाधिकारी म्हणून अधिकार प्रदान करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे. या अधिकारानुसार त्यांनी त्यांचे क्षेत्रात आवश्यकतेनुसार वापर करुन निवडणूक सुरळीत पार पाडावी.
0000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा