पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

 


अकोला,दि.14(जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे शनिवार, रविवार दि. 16 व 17 ऑक्टोबर रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शनिवार दि.16 रोजी सकाळी नऊ वाजता अमरावती येथून मुर्तिजापूरकडे प्रयाण, सकाळी 11 वाजता हनुमान व्यायाम शाळा उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी साडेअकरा वाजता चंडिकादेव संस्थान कुरणखेड ता.अकोलाकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता चंडिकादेवी संस्थान  कुरणखेड जि.अकोला येथे आगमन व भुमिपूजन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी एक वाजता अकोलाकडे प्रयाण व दुपारी दिड वाजता अँड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.

दुपारी दोन वाजता जिल्हा नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे दिव्यांगाकरीता असलेला पाच टक्के निधी खर्चाबाबत आढावा व दि. 28 ऑगस्ट 2021 रोजी सभेमधील निर्देशानुसार केलेले अनुपालन. दुपारी अडीच वाजता  अकोला जिल्ह्यातील रस्ते, शासकीय इमारती बांधकाम, सांस्कृतिक भवन व पोलीस वसाहत बांधकामाबाबत आढावा सभा, दुपारी तीन वाजता मेळघाट व्याघ्र प्रकल्प पुर्नवसन अंतर्गत अकोट व तेल्हारा तालुक्यातील पुनर्वसीत गावांना सोई सुविधा पुरविणेबाबत आढावा सभा. दुपारी साडेतीन वाजता मराठा रेस्ट्रारंट, राष्ट्रीय महामार्ग-6 बाळापूर हायवे, बाळापूरकडे प्रयाण, दुपारी चार वाजता शेतकरी पती-पत्नी आत्महत्याग्रस्त कुटूंबातील कोरोनामुळे पालकत्व गमावलेल्या मुलांना दरमहा आर्थिक मदत वाटप करणे, अनाथ मुले दत्तक घेणारे दाम्पंत्यांचा सत्कार कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी पाच वाजता जनसंपर्क कार्यालय, साई काम्प्लेक्स, बाळापूर येथे प्रहार जनशक्ती पक्ष उद्धाटन कार्यक्रम, सायंकाळी साडेपाच वाजता अकोलाकडे प्रयाण.  सायंकाळी सव्वासहा वाजता श्री. संत गाडगेबाबा निवारा(बेघर निवारा), अकोट फैल येथे सामुदायिक प्रार्थना कार्यक्रम.

रविवार दि. 17 रोजी सकाळी नऊ वाजता कॅनॉल रोड, डाबकी रोड अकोलाची पाहणी कार्यक्रम, सकाळी 10 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना जुनी पेंशन योजना लागू करणे. सकाळी साडेदहा वाजता सौ. विमल बाबुराव पगोरे रा. लंघापूर यांचे तक्रारीचे अनुषंगाने सुनावणी. सवडीने दर्यापूर मार्गे अमरावतीकडे प्रयाण.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ