आपले सरकार सेवा केंद्राच्या निवडसूचीबाबतचे आक्षेप शुक्रवार (दि.8) पर्यंत नोंदवा

 


अकोला,दि.7(जिमाका)-  जिल्ह्यातील महानगरपालिका, नगरपालिका व ग्रामपंचायत  क्षेत्रातील आपले सरकार सेवा केंद्राकरीता पात्र झालेल्या उमेदवारांची अंतिम निवड सूची संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली. याबाबत जिल्हाधिकारी यांनी सुनावणी घेवून अंतिम निर्णय जाहीर केला असून आक्षेप व निर्णय सूची जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळावर www.akola.gov.in वर प्रसिध्द करण्यात आली आहे. याबाबत आक्षेप व तक्रार असल्यास ते लेखी आक्षेप जिल्हाधिकारी कार्यालय येथील महाआयटी कार्यालय येथे शुक्रवार दि. 8 ऑक्टोंबर 2021 रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाठवावे. यानंतर प्राप्त होणारे कोणत्याही तक्रारी ग्राह्य धरल्या जाणार नाही. तसेच शनिवार दि. 9 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता आक्षेप, तक्रार व विनंती सुनावणीसाठी उपस्थित राहावे. निवडसूचीमध्ये ज्या ग्रामपंचायत मधील अर्जदारांना मुलाखतीसाठी प्रलंबित ठेवण्यात आले होते त्यांनी देखील उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ