बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कार; शुक्रवार(दि.१५) पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविले

 अकोला,दि.१२(जिमाका)- केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती व बाल कल्याण पुरस्कार दिला जातो. या पुरस्काराकरीता www.ncawcd.nic.in या संकेतस्थळाद्वारे ऑनलाईन पद्धतीने  अर्ज स्विकारले जाणार असून अंतिम मुदत शुक्रवार दि. १५ आहे. पात्र व इच्छुकांनी अर्ज करावे,असे आवाहन जिल्हा माहिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले आहे.

बाल शक्ती पुरस्कार : वय वर्षे पाचपेक्षा अधिक व १८. शिक्षण, कला व सांस्कृतीक कार्य, खेळ, नाविन्यपूर्ण शोध सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपूण्य पूर्ण कामगिरी केलेले.

बाल  कल्याण पुरस्कार : ) व्यक्तिगत पुरस्कार :  मुलांचा विकास, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कोणत्याही प्रकारचे वेतन अथवा मानधन न घेता मानसेवी उदात्त भावनेतुन किमान सात वर्ष काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.

) संस्थास्तरावर : बाल कल्याण  क्षेत्रात अपवादात्मक कार्य करणाऱ्या संस्थेला हा पुरस्कार दिला जातो. संस्था पुर्ण: शासनाच्या निधीवर अवलंबुन नसावी. बाल कल्याण क्षेत्रात किमान १० वर्ष सातत्यपूर्ण उत्कृष्ट कार्य करणारी असावी.

०००००

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ