जागतिक अंडी दिवसानिमित्त वेबीनार

 

अकोला,दि.7(जिमाका)-  महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर व स्नातकोत्तर पशुवैद्यक व पुशविज्ञान संस्था अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक अंडी दिवसानिमित्त ऑनलाईन वेबीनार शुक्रवार दि. 8 ऑक्टोंबर रोजी दुपारी तीन वाजता आयोजित करण्यात आली आहे. या वेबीनार कार्यक्रमास जिल्ह्यातील कुक्कुटपालक, पशुवैद्यक, शेतकरी, विद्यार्थी व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन  स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्थाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सी.एच पावशे यांनी केले आहे.

या ऑनलाईन वेबीनार कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी https://zoom.us/j/94320495363?pwd=YXpGQXgxMzFIZmFIYS9xT1FaUVNKQT09 या लिंकव्दारे झुम मिटींगव्दारे सहभागी होता येईल. वेबीनार कार्यक्रम महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूरचे कुलगुरु डॉ. ए.एम.पातुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन संचालक (विस्तार शिक्षण) डॉ.अनिल भिकाने यांच्याहस्ते तर प्रमुख वक्ते म्हणून व्यंकटेश्वरा हॅचरिज प्रा.लि.चे उपमहाव्यवस्थापक डॉ. प्रसन्न पेडगावकर उपस्थित राहणार आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ