242 अहवाल प्राप्त, तीन पॉझिटीव्ह; एक मृत्यू - रॅपिड ॲन्टीजेनमध्ये एक पॉझिटीव्ह


अकोला,दि.19(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 242 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 239  अहवाल निगेटीव्ह तर तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.18) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57877(43270+14430+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर तीन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी एक = एकूण पॉझिटीव्ह चार  

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 326607 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 322975 फेरतपासणीचे 402 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3230 नमुने होते. आजपर्यंत एकूण 326607 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 283337 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

तीन पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात तीन जणांचाा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महिला व एक पुरुषाचा समावेश  असून ते तेल्हारा तालुक्यातील रहिवासी आहे. दरम्यान रॅपिड ॲन्टीजेन चाचणी अहवालात एका रुग्णाचा समावेश आहे,  याची नोंद घ्यावी.

एकाचा मृत्यू

आज दिवसभरात  तेल्हारा तालुक्यातील  एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. त्यांना दि. 18 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

22 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57877(43270+14430+177) आहे. त्यात 1139 मृत झाले आहेत. तर 56716 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 22 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 110 चाचण्यात एक पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.17) दिवसभरात झालेल्या 110 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरात मुर्तिजापूर येथे 19, अकोला महानगरपालिका येथे 51, हेगडेवार लॅब येथे आठ चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 32 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, असे एकूण 110 चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला,  असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

                                                                        ०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ