मास्कचा वापर बंधनकारक-जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

 


 

अकोला,दि.28(जिमाका)- ब्रेक द चेन’ अंतर्गत मार्गदर्शक सूचनेत निर्बंधासह शिथीलता देण्यात आली आहे. या शिथीलतेमुळे कोविड-19 संसर्गाचा फैलाव होवू नये याकरीता शासनाच्या दिशानिर्देशानुसार  जिल्ह्यातील सर्व प्रकारची शासकीय, निमशासकीय तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांना मास्कचा वापर व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

आदेशात म्हटल्यानुसार,  अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी तसेच कार्यालयात कामकाजास्तव येणाऱ्या सर्व अभ्यागतांनाही कार्यालय व कार्यालयाच्या आवारात नाक व तोंड पूर्णत: झाकले जाईल अशा पद्धतीने मास्क वापरणे बंधनकारक राहील. अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांच्या कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण झाल्याची खातरजमा संबंधीत कार्यालयाच्या कार्यालय प्रमुख, आस्थापना प्रमुख, प्रभारी अधिकारी यांनी करावी व कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण पूर्ण झाल्याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधीत अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून प्राप्त करून घ्यावे, ज्या कर्मचाऱ्यांचे लसीकरणासाठी काही अडचण असल्यास नजीकच्या लसीकरण केंद्रात किंवा सार्वजनिक आरोग्य विभागात संपर्क करून कार्यालयीन अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी लसीकरणाचे विशेष सत्र आयोजित करावे, जेणेकरून सर्व अधिकारी, कर्मचारी यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.

            सर्व प्रकारच्या कार्यालयीन आस्थापनांनी दैनंदिन कामकाजा दरम्यान मास्कचा सुयोग्य वापर तसेच लसीकरण पूर्ण करून घेणे, यावर देखरेख करण्यासाठी संबंधीत विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख हे आस्थापना अधिकारी किंवा अधिकाऱ्यास नामनिर्देशित करतील. अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यालयाच्या आवारात अभ्यागतांसह मास्कचा वापर अनिवार्य करण्यात येत असल्याने विनामास्क  वावरणाऱ्या अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी यांना संबंधीत अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी ज्या विभागाच्या क्षेत्रात, आवारात विनामास्क आढळला त्या कार्यालयाच्या नामनिर्देशित अधिकारी, कार्यालय प्रमुखाने नामनिर्देशित केलेले अधिकारी दंड करण्यास समक्ष प्राधिकारी राहील.

            अकोला जिल्ह्यातील इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कार्यालयातील विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख यांनी त्यांचे कार्यक्षेत्राकरीता त्यांचे अधिनस्त असलेल्या कर्मचारी, अधिकारी यांना त्यांचे कार्यालयाच्या परिसरात विनामास्क आढळून येणाऱ्या अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी यांचेवर दंडात्मक कारवाई करण्याकरीता प्राधिकृत करावे.

            सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांच्या कार्यालयामध्ये आढळून आलेल्या अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी हे विनामास्क आढळून आल्यास त्यांना 200 रूपये प्रत्येकी या प्रमाणे दंडाची आकारणी करावी. सक्षम प्राधिकारी विनामास्क आढळणाऱ्या अभ्यांगत, कर्मचारी, अधिकाऱ्यांना दंड आकारणी करून त्याबाबतची पावती देईल. सक्षम प्राधिकारी सदर दंडाची रक्कम संबंधीत कार्यालयाच्या आहरण व संवितरण अधिकाऱ्याकडे जमा करेल व आहरण व संवितरण अधिकारी यांनी दंडाची रक्कम महसूल जमा (सी) इतर कराव्यतिरिक्त महसूल एक सर्वसाधारण सेवा 0070-इतर प्रशासनीक सेवा 800 इतर जमा रक्कम लेखशिर्षाखाली जमा करावी.

           अकोला जिल्ह्यातील सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच खाजगी व औद्योगिक आस्थापनांमध्ये कार्यालयाच्या आवारात मास्क लावणे अनिवार्य राहील अशा प्रकारच्या सूचना दर्शनी भागात लाऊन तसेच सूचित करावे व अभ्यागत, कर्मचारी, अधिकारी यांनी मास्क लावल्याशिवाय त्यांना प्रवेश देण्यता येऊ नये. नो मास्क नो एन्ट्री चे फलक दर्शनी भागावर लावण्यात यावे.

आदेशाची अंमलबजावणी करतांना कोविड-19 विषाणूचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी शासनाने व स्थानिक प्रशासनाव्दारे वेळोवेळी  निर्गमित केलेले कोविड-19 संबंधित आदेश व मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक राहिल.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ