जिल्ह्याधिकारी कार्यालयात अभिवादन




अकोला,दि.31(जिमाका)- देशाचे पहिले माजी गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आज अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लोकशाही सभागृहात सरदार वल्लभभाई पटेल व माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरम्यान  राष्ट्रीय एकता दिवस निमित्त शपथ देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ