मिशन कवच कुंडलःदिवाळीपूर्वी अधिकाधिक लोकांच्या लसीकरणाचे नियोजन करा- जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे निर्देश

 



अकोला. दि.८(जिमाका)- मिशन कवच कुंडल अंतर्गत कोविडच्या संभाव्य तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी दिवाळीच्या आत अधिकाधिक लोकांचे लसीकरण व्हावे यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करा, त्यासाठी उपविभागीय अधिकारी ते गावातील ग्रामसेवक तलाठी, आशा, अंगणवाडी सेविका या सर्व यंत्रणेनी  समन्वय राखून प्रयत्न करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज येथे दिले.

जिल्ह्यातील कोविड लसीकरण सद्यस्थितीबाबत  आज आढावा घेण्यात आला. याबैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, डॉ. मनिष शर्मा, तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, गटविकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी,तहसिलदार आदी उपस्थित होते.

यावेळी संजय खडसे यांनी सांगितले की, जिल्ह्यात लसीकरणाचा टक्का वाढविणे हे तिसरी लाट थोपविण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. मिशन कवच कुंडलच्या अंतर्गत आपल्या जिल्ह्यातील लसीकरणासाठी पुरेसे डोस उपलब्ध होत आहेत. तालुका पातळीवर लसीकरणाचे नियोजन करुन उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांनी आढावा घ्यावा.

जिल्ह्यत दररोज  एका लसीकरण केंद्रावर १५० जणांचे लसीकरण झाल्यास हे अभियान यशस्वी करता येईल.  सद्यस्थितीत जिल्ह्यात जिल्हा आरोग्य अधिकारी यंत्रणे अंतर्गत अकोला तालुक्यात  ३२,  अकोट १५, बाळापूर १६, बार्शी टाकळी १७,  तेल्हारा १०, मुर्तिजापुर १५,  पातूर १२ असे ११७ लसीकरण केंद्र आहेत. तर जिल्हा रुग्णालय अंतर्गत ग्रामिण रुग्णालय  अकोट,चार, बाळापूर पाच,  बार्शी टाकळी दोन, तेल्हारा दोन,  चतारी एक, उपजिल्हा रुग्णालय मुर्तिजापूर दोन,  उपकेंद्र नंदीपेठ ३, गोलबाजार २, आयएमए हॉल येथे १,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय  प्रत्येकी एक  असे २४ सत्र  तर मनपा आरोग्य यंत्रणेचे  १०- असे जिल्ह्यात एकूण १५१ सत्रांचे नियोजन करण्यात आले आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

लसीकरणाचे प्रमाण वाढविण्यासाठी आता शिक्षकांनी जी मुले शाळेत येतात यांच्या पालकांनी लसीकरण केल्याबाबत खात्री करावी, १८ वर्षे वयाच्या लोकांना लसीकरण होत असल्याने महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी  आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी व त्यांच्या पालकांनी लसीकरण केल्याबाबत पाठपुरावा करावा, जिल्ह्यातील सर्व शासकीय विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील कर्मचारी व त्यांचे पात्र गटातील कुटुंब सदस्य यांचे लसीकरण झाल्याबाबत खातरजमा करावी, याच प्रमाणे दुकाने, एम आय डी सी येथील उद्योग इ. ठिकाणी लसीकरणाबाबत पाठपुरावा करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासन संबंधित यंत्रणांना देत आहे, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ