तुलंगा ता. पातुर येथे बालकांच्या हक्कांबाबत जनजागृती

 अकोला, दि.१ (जिमाका)- महिला व बालविकास विभागांतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष व चाईल्ड लाईन या यंत्रणा बालकांसाठी कार्यरत आहेत. बालकांचे हक्क व अधिकार तथा कायदे याबाबत समाजात जनजागृती व्हावी या करीता या यंत्रणा मार्फत विविध जनजागृती कार्यक्रम राबविण्यात येतात. त्याअंतर्गत  जिल्हा परीषद शाळा व किसान विद्यालय तुलंगा ता.पातुर या शाळा मध्ये जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या कार्यक्रमांमध्ये जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे संरक्षण अधिकारी सुनिल लाडुलकर
यांनी पॉक्सो अधिनियम, ‘गुड टच बॅड टच’, बालकांसाठी कार्यरत जिल्ह्यातील यंत्रणा या
बाबत माहीती दिली. तसेच चाईल्ड लाईनच्या समन्वयिका हर्षाली गजभीये यांनी चाईल्ड
लाईनची संकल्पना, चाईल्ड लाईनचे कार्य (टोल फ्री कमांक १०९८)  सांगितले तसेच बडबड गितांच्या माध्यमातुन बालकांकडुन चाईल्ड लाईनचा नंबर पाठांतर करून घेतला. तसेच विक्रांत बन्सोड यांनी बालकांना लॅपटॉपवर पॉक्सो बाबत चित्रफित दाखविली व माहीती दिली.  शाळांमध्ये लावण्याकरीता ‘चांगला स्पर्श वाईट स्पर्श’, या बाबत माहीती असणारे बॅनर देण्यात आले.

बालविवाह,हरविलेले बालक, बालकांचे हक्क व अधिकार या बाबत काही घटना होत
असल्यास चाइल्ड लाइनचा टोल फ्री कमांक १०९८ वर संपर्क करण्याचे आवाहन महिला व
बालविकास विभागामार्फत करण्यात आले आहे.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चाईल्ड लाईनच्या
सर्व कर्मचारी वर्गाने प्रयत्न केले, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी कळविले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना