मौजे चेलका व मौजे कातखेडा येथील मंदीर परिसरात प्राणी कत्तलीस निर्बंध

 अकोला, दि.१२(जिमाका)- मौजे चेलका व मौजे कातखेडा येथील मंदिरात  नवरात्रोत्सवात देवीच्या मंदीराच्या २०० मिटर परिसरात   बोकड बळी देण्यास तसेच  प्राण्यांची कत्तल करण्यास निर्बंध घालण्यात आले असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत. हे निर्बंध दि.१२ ते १५ या कालावधीसाठी असून फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ (१) व १४४(२) अन्वये हे आदेश निर्गमित करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. या आदेशाच्या अनुषंगाने  उपविभागीय दंडाधिकारी मुर्तिजापूर यांनी  आवश्यक ती कार्यवाही करावी,असे निर्देश अपर जिल्हादंडाधिकारी संजय खडसे यांनी दिले आहेत.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम