३६९ अहवाल, तीन पॉझिटीव्ह;दोन डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेनमध्ये शुन्य पॉझिटीव्ह

 अकोला,दि.८(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ३६९ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ३६६ अहवाल निगेटीव्ह, तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.७) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्येही कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८६८(४३२६२+१४४२९+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

 आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर तीन + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह तीन

 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३२४४९८ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३२०८७०  फेरतपासणीचे ४०२ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३२२६ नमुने होते. आजपर्यंत एकूण ३२४४९८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २८१२३६ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

तीन पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात तीन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महिला व एका पुरुषाचा  समावेश असून ते दोन अकोला ग्रामीण तर एक अकोला मनपा क्षेत्रातील आहे. दरम्यान रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला, याची नोंद घ्यावी.

दोन जणांना डिस्चार्ज

आज दिवसभरात होम आयसोलेशन येथील दोन जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

१५ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८६८(४३२६२+१४४२९+१७७) आहे. त्यात ११३७ मृत झाले आहेत. तर ५६७१६ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत १५जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः २११ चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह

 कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.७) दिवसभरात झालेल्या २११  चाचण्या झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

            काल दिवसभरा मुर्तिजापूर येथे ११, अकोला महानगरपालिका क्षेत्रात येथे १५७, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ३६ तर हेगडेवार लॅब येथे सात  चाचण्या  अशा एकून २११ चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,असे जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ