जि.प.व पं.स.पोटनिवडणुक: कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू
अकोला, दि.2(जिमाका)- जिल्हा परिषद व पंचायत समिती पोट निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला आहे. या क्षेत्रातील निवडणुका निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.
आदेशात म्हटल्याप्रमाणे :
- जिल्हा परिषद व पंचायत
समिती पोटनिवडणूक-2021 निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यापासून
निवडणूकीची प्रक्रिया संपेपर्यंत शस्त्र परवानाधारकास शस्त्र वाहून नेण्यास
प्रतिबंध करण्यात येत आहे. जो कोणी या नियमांचे उल्लंघन करील तो इसम तथा शस्त्र
परवानाधारक दंडनीय कार्यवाहीस पात्र ठरेल.
- ज्या ठिकाणी मतदान होणार आहे, त्या मतदान केंद्राच्या ठिकाणपासून 200 मीटर परिसरात सर्व
पक्षकारांचे मंडप, सर्व दुकाने,
मोबाईल फोन, पेजर, वायरलेस सेट, ध्वनीक्षेपक, सर्व प्रकारचे फेरीवाले व इतर
ईलेक्ट्रॉनिक उपकरणे, निवडणूकीच्या कामाव्यतिरिक्त
खाजगी वाहन, संबंधीत पक्षांचे चिन्हांचे प्रदर्शन व
निवडणूक कामाव्यतिरिक्त व्यक्तीस प्रवेश करण्यास प्रतिबंध करण्यात येत
आहे.
- ज्या ठिकाणी निवडणूक साहित्य कक्ष (STRONG ROOM)
आहेत, तसेच जिल्ह्यातील मतदान
केंद्रावर आणि ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, अशा
ठिकाणी 200 मीटर परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू राहतील.
0000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा