आज ‘शून्य’:एकास डिस्चार्ज
अकोला,दि.४(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ७८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ७८ अहवाल निगेटीव्ह तर कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.३) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्येही कुणाचाही अहवाल
पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८६२(४३२५६+१४४२९+१७७) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली
आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-
आरटीपीसीआर शून्य + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह शून्य
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३२३२८६ नमुने
तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे ३१९६६२ फेरतपासणीचे ४०२ तर वैद्यकीय
कर्मचाऱ्यांचे ३२२२ नमुने होते. आजपर्यंत
एकूण ३२३२८६अहवाल
प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २८००३० आहे, अशी माहिती
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
‘शून्य’ पॉझिटिव्ह
आज दिवसभरात आरटीपीसीआर तसेच रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह
आला नाही.
एकास डिस्चार्ज
दरम्यान आज दिवसभरात होम आयसोलेशन मधील एका रुग्णास डिस्चार्ज
देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
१४ जणांवर
उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या ५७८६२(४३२५६+१४४२९+१७७) आहे. त्यात ११३७मृत झाले
आहेत. तर ५६७११ जणांना डिस्चार्ज
देण्यात आला असून सद्यस्थितीत १४ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
रॅपिड ॲन्टीजेन
चाचण्याः ७६चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात काल (दि.३) दिवसभरात झालेल्या ७६चाचण्या
झाल्या त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, अशी माहिती जिल्हा
रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला महानगरपालिका क्षेत्रात येथे ६०, शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयात १६ चाचण्या
झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे ७६ जणांच्या चाचण्या
होऊन त्यात कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा