प्रादेशिक परिवहन कार्यालय सार्वजनिक सुटीच्या दिवशी शुक्रवार(दि.15) रोजी सुरु

 अकोला, दि.13(जिमाका)- दसऱ्याच्या मुहूर्तावर जिल्ह्यात नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत असते. त्याअनुषंगाने नवीन वाहनांना नोंदणी क्रमांक मिळून नागरिकांना वाहनाचा ताबा मिळावा. तसेच शासकीय महसूल जमा व्हावा याकरीता शुक्रवार दि. 15 ऑक्टोंबर रोजी दसऱ्याच्या सार्वजनिक सुटीच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय सुरु राहिल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी कळविले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

राज्य माहिती आयोग अमरावती खंडपीठाकडे इ-मेलद्वारे अर्ज करावा