महामार्गालगत भूसंपादन तक्रारींबाबत पालकमंत्र्यांनी घेतला आढावा

 








अकोला,दि.२३(जिमाका)- जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा व क्रमांक १६१ च्या विस्तारीकरणाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या भूसंपादन प्रकरणांमधील शेतकऱ्यांच्या तक्रारींच्या अनुषंगाने राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आढावा घेतला.

जिल्हा नियोजन सभागृहात झालेल्या या आढावा बैठकीस  जिल्हाधिकारी निमा अरोरा,  अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, तसेच अन्य अधिकारी व शेतकरी उपस्थित होते. यावेळी या महामार्गांलगत शेतकऱ्यांनी भूसंपादनाच्या मोबदल्या संदर्भात केलेल्या तक्रारी, त्यांचे प्रलंबित प्रकरणे याबाबत माहिती सादर करण्यात आली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा विस्तारीकरण तसेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१  विस्तारीकरण शेतजमीन भूसंपादन संदर्भातील तक्रारींचा लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी  नियोजन करावे,असे निर्देशही पालकमंत्री  कडू यांनी दिले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ