मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम; १३,१४ व २७,२८ नोव्हेंबर रोजी मतदार नोंदणीसाठी विशेष मोहिम

 


अकोला,दि.२७(जिमाका)- मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम दि. जानेवारी २०२२  या अर्हता दिनांकावर घोषित करण्यात आला आहे. या कार्यक्रमानुसार मतदार नोंदणीकरीता कालावधी निश्चित करण्यात आला असून शनिवार, रविवार दि. १३, १४ २७,२८ नोव्हेंबर या कालावधीत  विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निमा अरोरा यांनी दिली आहे.

जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघांमधील छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रमानुसार एकत्रीकृत प्रारुप मतदार यादी सोमवार दि. नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध होईल. सोमवार दि. ते मंगळवार दि. ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत दावे व हरकती स्विकारण्यात येईल. तसेच विशेष मोहिमेअंतर्गत शनिवार दि. १३, रविवार दि.१४ व शनिवार दि. २७, रविवार दि.२८ नोव्हेंबर रोजी राबविण्यात येणार आहे. सोमवार दि. २० डिसेंबरपर्यंत दावे व हरकती निकालात काढण्यात येणार आहे. तर मतदारांची अंतिम यादी बुधवार दि. जानेवारी २०२२ रोजी प्रसिद्ध होईल.

  जिल्ह्यातील नागरिकांनी  मतदार यादीत नाव समाविष्ट करणे, नावे वगळणे, इ. करीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी  यांच्याकडे आवश्यक फॉर्म भरुन  द्यावे. मतदार यादीतील दुबार नावे, स्थलांतरीत, मयत मतदारांची नावे वगळणे ही कार्यवाही सुद्धा याच मोहिमेत होणार आहे. जिल्ह्यातील पात्र मतदार नव मतदार यांनी आपली नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी  www.nvsp.in  या संकेतस्थळावर जाऊन  आपले नाव नोंदवावे. तसेच voter helpline app च्या सहाय्यानेही मतदारांना आपले नाव नोंदविता येईल. याव्यतिरिक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचेकडे विहित नमुन्यात अर्ज भरुन ऑफलाईन पद्धतीनेही नाव नोंदविता येईल.  तरी मतदारांनी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ