कृषी मंत्री ना. दादाजी भुसे यांचा जिल्हा दौरा

 


अकोला,दि.28 (जिमाका)- कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री ना. दादाजी भुसे हे शुक्रवार दि. 29 रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

शुक्रवार दि. 29 रोजी पहाटे 4 वा.20 मि. नी मनमाड येथून विदर्भ एक्सप्रेसने अकेाला रेल्वेस्थानक येथे आगमन व शासकीय वाहनाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोलाकडे प्रयाण. सकाळी 4 वा. 40 मि. नी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे आगमन व राखीव. सकाळी साडेआठ वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथे कृषी विभाग आढावा बैठक. सकाळी साडेदहा वा. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथील 35 व्या दीक्षांत समारंभ कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी दीड ते अडीच दरम्यान राखीव व सोईनुसार डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला येथून शासकीय वाहनाने अकोला रेल्वेस्थानकाकडे प्रयाण. दुपारी 3 वा. 20 मि. नी  अकोला रेल्वे स्थानक येथे आगमन व महाराष्ट्र एक्सप्रेसने मनमाडकडे प्रयाण.

00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ