96 अहवाल प्राप्त, एक पॉझिटीव्ह, पाच डिस्चार्ज; रॅपिड ॲन्टीजेनमध्ये शुन्य पॉझिटीव्ह
अकोला,दि.20(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच
वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 96
अहवाल प्राप्त झाले. त्यातील 95 अहवाल
निगेटीव्ह तर एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर पाच
जणांना डिस्चार्ज देण्यात आले, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.19) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह
आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण
संख्या 57878(43271+14430+177) झाली आहे, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर एक + रॅपिड
ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह एक
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त
माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 326703 नमुने तपासण्यात आले.
त्यात प्राथमिक तपासणीचे 323071 फेरतपासणीचे 402 तर
वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3230 नमुने
होते. आजपर्यंत एकूण 326703
अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 283432 आहे, अशी
माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
एक पॉझिटिव्ह
आज दिवसभरात एकाचा
अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका पुरुषाचा
समावेश असून हा रुग्ण मुर्तिजापूर तालुक्यातील रहिवासी
आहे. दरम्यान रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यात कुणाचाही अहवाल
पॉझिटीव्ह आला नाही, याची
नोंद घ्यावी.
पाच जणांना डिस्चार्ज
आज दिवसभरात होम आयसोलेशन येथील पाच जणांना डिस्चार्ज देण्यात आला,
अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
18 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57878(43271+14430+177) आहे. त्यात 1139 मृत झाले आहेत. तर 56721 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 18 जणांवर
उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली
आहे.
रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 88 चाचण्यात शुन्य पॉझिटीव्ह
कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे.
यात काल (दि.19) दिवसभरात झालेल्या 88 चाचण्या झाल्या त्यात शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात अकोला महानगरपालिका येथे 58, शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयात 26, हेगडेवार लॅब येथे चार चाचण्या झाल्या त्यात
कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे एकूण 88 चाचण्या कुणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही,
असे
जिल्हा रुग्णालयाने कळविले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा